Pomegranate : विठ्ठल सावंत यांच्या एकत्रित कुटुंब पद्धतीने वाढविला डाळिंबाचा गोडवा - डिजिटल शेतकरी

Pomegranate : विठ्ठल सावंत यांच्या एकत्रित कुटुंब पद्धतीने वाढविला डाळिंबाचा गोडवा

Pomegranate: निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील विठ्ठल हरिभाऊ सावंत यांनी चाळीस गुंठे क्षेत्रावर ३३० डाळिंब झाडांची सेंद्रिय खते पद्धतीची जोपासना करीत पाचट आच्छादनाचा मूलमंत्र जपत एकतीस लाखांची अर्थप्राप्ती केली गेली आहे. सावंत पती-पत्नी, त्यांची दोन मुले, सुना, चार नातवंडे असे मिळून दहा जणांच्या एकत्रित कुटुंबाचा राबता असल्याने ही किमया सत्यात उतरली गेली आहे.Pomegranate

या कुटुंबाने २०१२ मध्ये माढूपटी नावाचे एक एकर बरड, मुरमाड जमिनीत भगवा जातीची ३३० झाडे चौदा बाय पंधरा अंतरावर लावली आणि पहिली दोन वर्षे जुजबी उत्पन्न मिळाले. नंतरच्या उत्पन्नातून विहीर खोदाई, ठिबक संच बसविणे,फवारणी सयंत्र खरेदी अशी पूरक कामे होऊन घरखर्चाला हातभार लागला.

यावर्षी हे तेरावे डाळिंब पीक आहे, असे यमाजी सावंत यांनी सांगितले आणि बेडवरील आंतरमशागत कुदळ, दाताळ वापरून मानवी बळाने केली जाते. झाडांच्या दुहेरी बाजूने खड्डे घेत शेणखताच्या जोडीने काहीअंशी रासायनिक खते टाकून खड्डे बुजविली जातात तसेच बेडचा ओलावा टिकावा. उन्हाळ्याची धग कमी लागावी म्हणनू उसाचे पाचट, बनग्या टाकाऊ वस्तूंचे आच्छादन केले जाते आणि यामुळे फळांवर बुरशीजन्य रोग कमी येत असल्याचा अनुभव आहे. गूळ, ताक, गोमूत्र, बेसन पीठ, पेंड स्लरी विद्राव्य पद्धतीने दिली जाते आणि त्यामुळे जीवाणूंची वाढ होऊन फळांना चमक येते, असा खुलासा नामदेव व अर्चना सावंत यांनी केला.

प्रति झाडास सत्तर ते ऐंशी किलो डाळिंब

प्रति झाडास सत्तर ते ऐंशी किलो डाळिंबाची फळे निघत असून जागेवरच व्यापाऱ्याने १२० रुपये दराने यावर्षी या बागेची खरेदी केली असल्याचे वास्तव चित्र समोर आले आणि चमकदार फळांचे दहा किलो वजन मोजून खोकी पॅकिंग करून हा माल दिल्ली, आग्रा अशा मोठ्या शहरांत विक्रीसाठी जात आहे., अर्थप्राप्ती होत असल्याने सावंत यांच्या एकत्रित कुटुंबाचा गोडवा अधिकच वृद्धिंगत होत आहे.Pomegranate

आता शेती जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा आपल्या मोबाईल वर

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा. फॉलो नसेल होत तर Whatsapp अपडेट करा

Leave a Comment